पत्रिकेवर पदवी न छापल्याने वराने लग्न मोडले अन् वधूने घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय ..

पालघर – देशातील बहुतेक भागात हुंडा न मिळाल्याने वराने (groom)किंवा त्याच्या कुटूंबाने लग्न मोडल्याची घटना समोर येतच असतात मात्र राज्यातील पालघरमध्ये एक धक्कादायक आणि विचित्र घटना घडली आहे. लग्न पत्रिकेमध्ये आपल्या पदवीचा विस्तृत उल्लेख न केल्याने शिक्षित वराने संतापाच्या भरात लग्न मोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे नैराश्यातून वधूने (bride)फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून तिला रूग्णालयात दाखल केले आहे.तसेच नवरोबा विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नारोबा फरार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पालघरमधील डॉ. जिनीतकुमार गावड व सिव्हिल इंजिनीअर वधू यांचे आज 25 एप्रिल रोजी लग्न होणार होते. तो विरारच्या नामांकित फार्मसी कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. 2018 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मुलगी व डॉ. गावड यांची भेट झाली. तेथून त्यांचे प्रेम जुळले. 25 एप्रिल रोजी दोघांचे रिसॉर्टमध्ये लग्न होणार होते. 19 एप्रिल रोजी परंपरेनुसार वधूचे आईवडील हे वराचे वडील बबन गावड आणि आई विभा यांना पहिली निमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेले होते. पत्रिकेवर वधूची पदवी छापली, पण वर डॉ. जिनीतकुमार याच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे त्याला राग आला व त्याने लग्नच करण्यास नकार दिला.
20 एप्रिल रोजी वर जिनीतकुमार याने पीडितेला भेटीसाठी बोलावले आणि त्या दरम्यान तिला अटी व शर्तींची यादी दिली. या अटी मान्य केल्या तरच लग्न करेन असही बजावले. मात्र वधूने अटी-शर्ती फेटाळून लावल्या. त्यानंतर त्याने लग्नाला नकार दिला. तिने शुक्रवारी बाथरूममध्ये जाऊन फिनाईल पित आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.
तसेच 1 मार्च रोजी डहाणू येथील एका रिसॉर्टमध्ये नेऊन वराने मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार पालघर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. वराच्या आईवडिलांनीही वधूविरोधात तक्रार केली असून वर जिनीतकुमार तसेच त्याचे आईवडिलदेखील फरार आहेत. त्यांना लवकरच अटक करू, असे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.