
मुंबई : जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत वित्त विधेयक मांडताना ही माहिती दिली.
महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी संप केला होता. राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चला संपाला सुरुवात केली होती. तब्बल सात दिवस हा संप सुरु होता. अखेरी या विषयावर एक समिती नेमलेली गेली. तिच्या अहवालातील शिफारशींवर सकारात्मक विचार करण्याचे सांगितले गेले. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. आता राज्य सरकारप्रमाणे केंद्र सरकारनेही या विषयावर महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
दूध भेसळीवर कारवाई सूत्रधारापर्यंत पोहचण्याचे आव्हान
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत वित्त विधेयक मांडताना ही माहिती दिली. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, वित्त सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाईल. ही समिती नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणार आहे. अर्थमंत्र्यांनी लोकसभेत वित्त विधेयक मांडले. फायनान्स बिल 2023 वर मतदान गदारोळात झाले. वित्त विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.