इंस्टाग्रामवर ओळख करून हनी ट्रॅप मध्ये व्यावसायिकाला लुटणारी टोळीला अटक

0 295

 पुणे –   मागच्या आठवड्यात इंस्टाग्राम( Instagram) या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका ३१ वर्षीय व्यवसायिकाला  ( Businessman) हनी ट्रॅप (Honey Trap ) प्रकरणात पुणेमध्ये लुटल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी एका टोळीला अटक केली असून या टोळीमध्ये एका तरुणीचा देखली समावेश आहे. या टोळीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (The gang that robbed a businessman in Honey Trap by identifying him on Instagram was arrested)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  न्यू पनवेल इथं राहणाऱ्या ३१ वर्षीय व्यावसायिकाची पुण्यातल्या एका महिलेसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती . या महिलेनं त्याला पुण्यात भेटायला बोलावलं. त्यानुसार हा तरूण ७ ऑगस्टला कोंढव्यातल्या येवलेवाडी इथं महिलेला भेटण्यासाठी आला . यावेळी या महिलेनं तरूणाला जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर व्यावसायिक परत पनवेलकडे जात असताना त्याला रस्त्यात तीन जणांनी अडवून व्यावसायिकाला मारहाण करत  तू या महिलेवर बलात्कार केला असून  आम्ही तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार देणार आहोत असं म्हणत तरूणाला धमकावलं. व्यावसायिकाकडे आरोपींनी ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली.
Related Posts
1 of 1,608

पैसै दिले नाही तर पोलिसांत तुझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली. पैसे दिले नाही तर महिलेसोबत लग्न करावं लागेल, असं कागदावर लिहून घेतलं. त्यावर तरूणाचा सही आणि अंगठा घेतला. घाबरलेल्या तरूणाने आरोपींना त्याच्याजवळ असलेले रोख ५० हजार रुपये दिले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर एटीएम कार्डमधून जबरदस्तीने ३० हजार रुपये काढून घेतले. पोलिसांनी अटक केल्यानंतर टोळीची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये या टोळीने अनेकांना लुबाडलं असल्याचं अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, बदनामीपायी कुणी तक्रार देण्यासाठी समोर आलेलं नाही. पनवेलच्या या व्यावसायिकानं तक्रार देण्याचं धाडक केलं आणि टोळीचा पर्दाफाश झाला आहे.(The gang that robbed a businessman in Honey Trap by identifying him on Instagram was arrested)

हे पण पहा –  मी नव्हे  तो पुन्हा येईल… ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: