पोलिसांच्या उपस्थित सादिक बिराजदार यांचा दफनविधी शांततेत पार

0 422

अहमदनगर – भिंगार पोलीस हद्दीमध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्या सादिक बिराजदार (Sadik Birajdar)  या तरुणाचा दफनविधी रात्री 3 च्या सुमारास पार पडले. यावेळी नागरिकांसह पोलिसांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(The funeral of Sadiq Birajdar, who was present at the police station, was held peacefully)

यावेळी D.y. SP संदीप मिटके (D.y. SP Sandeep Mitke) यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी प्रत्येक घटनेवर बारीक लक्ष देत कोणती ही चूक न होऊ देता ही दफनविधी शांततेत पार पडली.

15 ऑगस्टच्या रात्री 7 ते 8.30 दरम्यान सादिक बिराजदार याला भिंगार पोलीस ठाण्यात घेऊन जात असता त्याच्यावर 5 जणांनी प्राणघात हल्ला केला आणि जीवे मारण्याच्या प्रयत्न केला अशी फिर्याद सादिक बिराजदारची पत्नीने भिंगार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

माञ दुसरीकडे भिंगार पोलीस सादिकला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलीस वाहनातून उडी मारल्याने त्याचा अपघात झाला अशी फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Related Posts
1 of 1,487

या प्रकरणात पोलिसांनी मूनिया उर्फ अजीम रसूल सय्यद ,रशीद रसूल सय्यद ,कुद्दुस रशिद सय्यद, मोईन मुनिया उर्फ अजीम सय्यद , अर्शद मुनिया उर्फ अजीम सय्यद सर्व राहणारे दर्गादयरा मुकुंदनगर या पाच जणांवर गून्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.(The funeral of Sadiq Birajdar, who was present at the police station, was held peacefully)

सादिक बिराजदार मृत्यू प्रकरण सीआयडीकडे ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: