श्री धर्मनाथ नियोजित मंदिराचा शिलाण्यास पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न

नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथे श्री शेत्र धर्मनाथ नियोजित मंदिराचा शिलाण्यास आणि कार्यारंभ आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार आणि श्री. महंत शंकर महाराज भारती यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला तांदळी वडगाव आणि परिसरातील ग्रामस्थ ही उपस्थित होते या मंदिरासाठी अनेकांनी देणगी दिल्या आहेत . सुमनबाई काशिनाथ धाडगे यांनी या मंदिर साठी नऊ लाख रुपये दान दिले आहेत. या मंदिराला हजारो वर्षांची परंपरा असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
या मंदिराचे बांधकाम बी. रामकृष्ण आणि जी. रेड्डी यांनी या भव्य मंदिराची रूप रचना तयार केली आहे. यावेळी ओम भारती महाराज, मोहती महाराज, सोहम भारती महाराज आणि प्रेमदास महाराज आदी मान्यवर उपस्थीत होते.