पोटच्या पोरासारख्या संभाळलेल्या उसाला शेतकरी हाताने लावतोय आग

0 241
The farmer is setting fire to the cane, which is being handled like a pot
प्रतिनिधी- DNA मराठी टीम
श्रीगोंदा ;- श्रीगोंदा तालुका (Shrigonda taluka) उसाचा आगार म्हणून प्रसिद्ध आहे पण कारखानदारांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेतकरी (Farmers) पुरता हताश झाला आहे पोटच्या मुलासारखे सांभाळलेल्या उसाला हाताने पेटवून देण्याची वेळ शेतकऱ्याला आली.  त्यामुळे शेतकरी वर्गातून कारखानदारांच्या नियोजन शून्य कारभारावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे मात्र तरीही कोणताही कारखानदार शेतकऱ्यांचा विचार करण्यास तयार नाही हे विदारक चित्र तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.
Related Posts
1 of 2,190
श्रीगोंदा तालुक्यात घोड कुकडी कालव्याचा सिंचनाचा मोठ्या प्रमाणात आधार असल्यामुळे तालुक्याचा बऱ्याच अंशी भाग बागायत आहे सर्वच गावामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो त्यासाठी चार साखर कारखाने तालुक्यात आहे.  यामध्ये सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना,साईकृपा साखर कारखाना हिरडगाव,कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील सहकारी साखर कारखाना तसेच देवदैठण येथील साजन शुगर असे एकूण चार साखर कारखाने तालुक्यात असताना हि शेतकऱ्यांच्या उसाची मोठ्या प्रमाणात हेळसांड केली जात आहे ऊसतोडीसाठी शेतकरी कारखान्याच्या कामगाराच्या मागे फिरताना दिसत आहेत तरीही कारखान्याचे कामगार आपली मनमानी कायम ठेवताना दिसत आहेत.
त्यांच्या अगदी कारखान्याचे चेरमन यांच्याकडे तक्रारी केल्या तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही तर काही ठिकाणी कारखाना कामगारांकडून ऊस तोडणीसाठी खुलेआम एकरी ५ हजार रुपयाची तर काही ठिकाणी वाट्टेल तेवढ्या रकमेची मागणी केली जात आहे याबाबत कोणी काही बोलल्यास त्याच्या शेतातील ऊस तोडणी टाळली जाते त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हताश झाला आहे ऊस लागवडीपासून अगदी आपल्या पोटच्या पोरासारखी सांभाळलेल्या उसाची हेळसांड होताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून मोठ्या प्रमाणात अश्रू वाहत आहेत आपला ऊस लवकर कारखान्याला जावा आणि दोन रुपये हातात पाडावेत यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्नशील आहेत मात्र कारखानदार यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका सर्वच शेतकरी वर्गाला बसताना दिसत आहे शेतकरी सांगतात की आम्ही पोटच्या पोरासारख्या संभाळलेल्या उसाला शेतकरी हाताने लावतोय आग असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही त्यामुळे अनेक शेतकरी ऊस न पिकवण्याचा निर्धार करताना दिसत आहेत  मात्र याबाबत कारखानदार बघ्याची भूमिका बजावताना दिसत आहेत.
जळालेल्या उसात कारखान्याकडून कपात 
ऊस जळाला कि कारखानदार यांच्याकडून ऊसतोडणी लगेच केली जाते मात्र ऊस जळल्यामुळे उसाचे वजन घटते आणि त्यामध्ये कारखानदार कपात करतात यामध्ये फायदा कारखानदार यांचा होतो तर दुहेरी नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे याचीही दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: