
अभियंत्यास लाच घेताना पकडले….
संगमनेर : पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्याकडे पैशांची मागणी करत १७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या
संगमनेर नगरपरिषदेतील कंत्राटी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने रंगेहाथ पकडले.
बुधवारी (ता. ३) संध्याकाळी शहरातील मोगलपुरा परिसरात ही कारवाई करण्यात आली. विकास जोंधळे (वय २८) असे या अभियंत्याचे नाव आहे. तो संगमनेर नगरपरिषदेत पंतप्रधान आवास योजनेचे काम पाहतो. असे असताना या योजनेच्या शहरातील लाभार्थ्याला त्याच्या पहिल्या मंजूर धनादेशासाठी अभियंता जोंधळे याने पैशांची मागणी केली होती.
शरद पवार यांच्या त्या वक्तव्याचा अखेर झाला उलगडा….
त्यानंतर त्या लाभार्थ्याने यासंदर्भात नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस हेड कॉन्स्टेबल पंकज पळशीकर, पोलिस नाईक नितीन कराड, पोलिस नाईक प्रकाश महाजन, चालक पोलिस नाईक परशुराम जाधव यांनी १७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कंत्राटी अभियंता जोंधळे याला पकडले.