सोसायटीच्या निवडणुकीची धामधूम सुरू अनेकांचे धाबे दणाणले

0 203
The election of the society started in earnest and many people were shocked
 
श्रीगोंदा  :- श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील सोसायटी निवडणुकाची (Society of Elections) धामधुम सध्या सुरू आहे. या निवडणुकीत अनेक इच्छुकांनी आपले नशिब अजमावले असून काहींना विजय तर काहींना पराभव मिळालेला आहे. परंतु निवडणुकीनंतर चेअरमन व्हाईस चेअरमन निवडी होईपर्यंत संचालक मंडळ संभाळताना इच्छुकांची दमछाक होत आहे. तर काही ठिकाणी सोसायटी निवडणूक लागली असल्याचे मोर्चेबांधणी सुरू असून उमेदवारांनी दमछाक होताना दिसत आहे.
Related Posts
1 of 2,357
सोसायटी निवडणुकांच्या रणधुमाळीने गावा-गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकांमुळे गावांमधील एकाच पक्षाचे दोन गट आमने सामने उभे ठाकलेले आहेत. त्यामुळे नेत्यांची दमछाक झालेली आहे. यामध्ये कोणत्या गटाला आपण पाठिंबा द्यायचा असा प्रश्न त्यांना पडत आहे. त्यामुळे काही नेते अलिप्त भूमिका घेत आहे. यावरून अनेकजण नाराज झालेले असून आम्ही तुम्हाला निवडणुकांमध्ये उघड पाठिंबा देतो मग तुम्ही का देत नाही, असा सवाल अनेकजण उपस्थित करीत आहेत.

 

 

सोसायट्यांच्या तालुक्यातील अनेक निवडणुका झालेल्या आहेत.तर काही होणे बाकी आहेत निवडणूक झालेल्या ठिकाणी आता चेअरमन व्हाईसचेअरमन निवडी होणे बाकी आहे. त्यामउळे निवडून आलेल्या संचालकांना अऩेकांनी सहलीला नेलेले आहे. या निवडीच्या दिवशीच संचालकांना आणण्याचे नियोजन नेत्यांनी केलेले आहे. या काळात होणारा खर्च इच्छुकांना घाम फोडणारा ठरत आहे. त्यामुळे काहीजण नको ते पद असे म्हणत आहेत. काठावर बहुमत मिळविलेल्या सोसायट्यांमधील इच्छुकांना आर्थिक झळ मोठी सोसावी लागत आहे.असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही मात्र तालुक्यातील काही ठिकाणी निवडणूक लागल्याने उमेदवारी साठीं मोर्चेबांधणी चालू आहे तर कोण कोणत्या पार्टीकडून उभा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: