दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, मला एकही पटेना, पठ्ठ्याचं थेट आमदारांना पत्र

0 431

चंद्रपूर –  आमदाराकडे दररोज कोणत्या ना कोणत्या अडी अडचणी सोडवण्यासाठी अनेक नागरिक पत्र लिहितात. असाच एक पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये एका तरुणाने आपल्याला कोणतीही मुली भाव देत नसल्याने थेट आमदारांनाच पत्र लिहिले आहे. हा पत्र चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील एका तरुणाचे आहे. या पत्रामध्ये दारुड्यांना गर्लफ्रेंड आहे, माझा जीव जळून जातो, मला एक ही पटेना अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांना हे पत्र लिहिण्यात आलं आहे. तर आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला आहे.

हा अर्जदार नेमका कोण आहे आणि कुठे राहतो याबाबत अद्याप अनभिज्ञता आहे. दारू विकणाऱ्याला आणि काळ्या पोरांना गर्लफ्रेण्ड असते, हे बघून जीव जळून राख होतो, असे पत्रात म्हटले आहे. पत्राच्या शेवटी अर्जदार भूषण जांबुवंत राठोड याने आमदारांना विधानसभा क्षेत्रातील मुलींना आपल्याला भाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची नमुनेदार विनंती केली आहे.

कोकणात होणार मोठा उलटफेर,नारायण राणेंची जागा निलेश राणे लढवणार?

पत्रात नेमकं काय?

प्रती आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा
विषय – गर्लफ्रेण्ड न पटण्या बाबत
अर्जदार – भूषण जांबुवंत राठोड
महोदय,
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज पेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा

Related Posts
1 of 1,635

आपला प्रेमी
भूषण जांबुवंत राठोड

आमदारांना पत्रच मिळालं नाही

दुसरीकडे आमदार सुभाष धोटे यांनी अशा आशयाचे पत्रच मिळाले नसल्याचा खुलासा केला असून क्षेत्रातील कार्यकर्त्यांना हा युवक शोधण्यास सांगितल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तो सापडलाच तर त्याची समस्या विचारपूस करून दूर करता येईल मात्र अशा पद्धतीने पत्रप्रपंच योग्य नव्हे असेही त्यांनी म्हटले आहे.

हे पण पहा – वॉर्ड बॉयची रुग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: