मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका कातकीडे च्या कुटुंबियांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, प्रकाश दिवान हे वैद्यकीय अधिकारी असल्याने अमरावतीत तिच्यावर शवविच्छेदन केल्यास तिच्या वैद्यकीय अहवालात छेडछाड होवू शकते, त्यामुळे अकोल्यात शवविच्छेदन करण्यात यावं, अशी मागणी कुटुंबियांनी धरून ठेवल्याने अकोल्यात तिच्यावर शवविच्छेदन केले गेले.
प्रियंका रमेश कातकीड़े वैद्यकीय परीक्षा दिल्यानंतर निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होती. तर अमरावती येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून पंकज शेषराव दिवान (वय ४१, राहणार राधा नगर, जि. अमरावती.) हे कार्यरत होते. येथून प्रियंका आणि पंकज यांची ओळख झाली, अन् प्रेम सबंध जुळले. त्यानंतर प्रियंकाच्या कुटुंबियांनी पंकज दिवाने यांच्याबरोबर ८ महिन्यापूर्वी लग्न झाले होते तेव्हापासून ते दोघेही सोबत राहायचे.
दरम्यान, २० एप्रिल रोजी पहाटे प्रियंकाच्या कुटुंबियांनी तिला कॉल केला असता संपर्क होऊ शकला. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिच्या घराकड़े धाव घेतली. परंतू ती मृत अवस्थेत आढळून आली. त्यानंतर यासंदर्भात गाडगेनगर पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि घटनेचा पंचनामा सुरू केला. मात्र, तिच्या कुटुंबियांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. त्याआधारे गाडगेनगर पोलिसांनी चौकशीची सूत्रे फिरवली आणि डॉ. दिवाण यांच्यासह घरातील इतर सदस्यांचे बयाणही नोंदवले आहे.