जिल्हा हादरला… ! 59 वर्षीय महिलेची हत्या , एकाला अटक

0 323
 अहमदनगर  –  जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील राहाता (Rahata) तालुक्यातील लोणी (Loni) गावात एका ५९ वर्षीय महिलेची हत्या (Murder) करण्यात आली आहे . अंजना मोहिते (Anjana Mohite) असं हत्या झालेल्या महिलेचं (woman) नाव असून मिळालेल्या माहितीनुसार ते  केडगावची रहिवासी होती. डोक्यात दगड घालून  ही हत्या झाल्याची असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (The district shook …! 59-year-old woman murdered, one arrested)
मिळालेल्या माहितीनुसार अंजना ही मागच्या १५ वर्षांपासून लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलसमोर असलेल्या हॉटेल पाकिजामध्ये काम करत होते. त्याच हॉटेलच्या एका छोट्याशा खोलीत ते राहत होते. हॉटेल मालक सकाळी आठ वाजता हॉटेलवर आले असता त्यांनी अंजनाला आवाज दिला. मात्र, तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी तिच्या खोलीच्या दिशेने जाऊन पाहिले असता खोलीचा दरवाजा उघडा दिसला. आत डोकावले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अंजना यांचा मृतदेह आढळून आला.
Related Posts
1 of 1,603
हे पाहून हॉटेल मालकाने तात्काळ लोणी पोलिसांना कळवले असता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. अज्ञात आरोपी विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फॉरेन्सिक पथकाच्या साहाय्याने धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. (The district shook …! 59-year-old woman murdered, one arrested)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: