राज्य सरकारचा निर्णय, परत एखदा राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे होणार सुरु

0 158

नवी मुंबई –   कोरोना विषाणूच्या (Corona virus)  दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले होते. आता राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. शाळा, धार्मिकस्थळांपाठोपाठ आता, राज्यभरतील चित्रपटगृहे  (Theaters) , नाट्यगृहे सुरू करण्यास देखील परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार २२ ऑक्टोबर पासून राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत.

आज मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान ‘वर्षा’ येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.कोरोना नियमांचे पालन करून चित्रपटगृहे व नाट्यगृहे सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली गेली आहे. राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

आज(शनिवार) टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.
Related Posts
1 of 1,608
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने बरेच निर्बंध शिथिल केलेले आहेत. मात्र असं असलं तरी सरकारने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे हाल होत होते. सरकारचं लक्ष याकडे वेधण्यासाठी राज्यात कलाकर व या क्षेत्राशी निगडीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यात ठिकठिकाणी आंदोलनं केले होते. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १ सप्टेंबरपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही घोषणा हवेत विरल्याची भावना या आंदोलकांमध्ये व कलाकारांमध्ये होती.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: