वडिलांनी बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याने मुलीने केली आपल्याच वडिलांची हत्या

0 406

भोपाळ –   मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मध्ये दहा दिवसापूर्वी एका 58 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. ही हत्या प्रेम प्रकरणावरून झाली आहे. आपल्या प्रेम प्रकरणावर नाराज असल्याने मुलीनेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. वडिलांनी आपल्या बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याचा राग मुलीच्या मनात धुमसत होता त्या ही हत्या करण्यात आली आहे.(The daughter killed her own father after the father beat up her boyfriend )

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ग्वाल्हेरमधील थाटीपूर भागात चार ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली होती. तृप्तीनगर परिसरात राहणाऱ्या रवीदत्त दुबे नावाच्या व्यक्तीची राहत्या घरात गोळी झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हत्येच्या वेळी त्यांची पत्नी, दोन्ही मुली आणि मुलगा हे सर्व घरातच होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांना जाग आली होती. रवीदत्त यांच्या पोटात गोळी लागल्याने रक्तस्राव होत असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

हे पण पहा –  पोलिसांसमोर पतीला मारले त्यांनी मद्दत केली नाही  – पिडीत पत्नीचा आरोप  

Related Posts
1 of 1,487

घरातील पहिल्या मजल्यावर घुसून एखाद्याची हत्या झाली, आणि तोपर्यंत घरात कोणालाच समजलं नाही, यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. पोलिसांनी घरातील सदस्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. तेव्हा धाकट्या मुलीचे पुष्पेंद्र नावाच्या तरुणाची गेल्या दोन आठवड्यात सर्वाधिक कॉल झाल्याचं समोर आलं. धाकट्या मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध असून रवीदत्त दुबे यांनी त्याला मारहाण केली होती, असं पोलीस तपासात उघड झालं.(The daughter killed her own father after the father beat up her boyfriend )

अभिनेत्री रश्मीने शेअर केले आंघोळ करतानाचे फोटो, चाहाते झाले घायाळ

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: