विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह, आत्महत्या की घातपात? तपास सुरु

0 367

बुलडाणा –   बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव (Pimpalgaon) गावाच्या बाहेर असलेल्या एका विहिरीत मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या एका तरुणाचा आणि तरुणीचा मुत्यूदेह आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.  या दोघांनी आत्महत्या (Suicide) केली किंवा काही घातपात (Murder) झाला?  या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. (The corpse of a young man in a well, suicide or murder? The investigation began)

या प्रकरणात मिळालेली अधिक माहिती अशी कि खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील प्रमोद ऊर्फ सुरेश भांबळकर आणि दुर्गा सावरकर हे दोघेही 11 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते.पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दोघेही हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र 13 ऑक्टोबरच्या सायंकाळी पिंपळगाव राजा येथील शेतकरी विठ्ठल पाटील हे शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांना एका विहिरीत दोघांचा मृतदेह तरंगताना दिसला.

एक लाखाच्या लाचेची मागणी, पोलीस निरीक्षकावर एसीबीची कारवाई

Related Posts
1 of 1,622

त्यानंतर शेतकरी विठ्ठल पाटील यांनी तातडीने पोलिसांना संपर्क करुन या घटनेची माहिती दिली.  घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला.  तर विहिरीच्या बाजूला एक दुचाकी सुद्धा अपघातग्रस्त अवस्थेत आढळल्याने या प्रकरणाचे गौडबंगाल वाढले आहे. हा घातपात आहे की आत्महत्या? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल. मात्र या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे ग्रामस्थ दबक्या आवाजात बोलत आहेत.(The corpse of a young man in a well, suicide or murder? The investigation began)

हे पण पहा – बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील | खासदार विखेंचा घणाघात

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: