दिवाळीपूर्वी शहराचे खड्डे न बुजविल्यास….. शिवसेनेने दिला आयुक्तांना इशारा

0 99
अहमदनगर  –  अहमदनगर शहरांमध्ये सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे खड्ड्याचा प्रश्न आहे.  नगर शहराची रस्त्याची विदारक व भयानक परिस्थिती झाली असून शहर शिवसेने (Shiv Sena) च्या वतीने आयुक्त शंकर गोरे (Commissioner Shankar Gore) यांना घेराव घालण्यात आला व शहराच्या खड्डे संदर्भात जाब विचारण्यात आला.
अहमदनगर शहर शिवसेनेच्या वतीने नगर शहराच्या रस्त्याची अत्यंत दैनी अवस्था काही दिवसांमध्ये झालेली आहे.  यापूर्वी नगरकरांनी रस्त्याची अत्यंत विदारक व भयानक परिस्थिती कधीही पाहिली नाही या नगर शहराच्या खड्ड्याचा प्रश्नांवर सोशल मीडियावर नगरसेवक राजकीय नेते व मनपा अधिकारी यांचे कमेंट चालू आहे असे असताना नगर शहरातील एकही रस्ता चांगला राहिलेला नाही व शहरातील अनेक संघटनेच्यावतीने निवेदने व आंदोलन झाले असून देखील कोणताही रस्ता पॅचिग कामासाठी करण्यास प्रशासन तयार नाही.
If the city's pits are not filled before Diwali ..... Shiv Sena gave a warning to the commissioner
 
शहरातील काही दिवसांपूर्वीच खड्ड्याचे पॅचिग काम केलेले आहे व ते संपूर्णपणे वाहून गेलेले आहे ठेकेदार हा रस्त्याच्या खर्चावर आर्थिक भ्रष्टाचार करत असल्याचे निदर्शनास आले आहे.  भुयारी गटार मार्गाचे काम चालू आहे त्यामध्ये भुयारी गटार साठी खोदलेला रस्ता त्याला पॅकिंग करून बुजवणे त्यानंतर त्याचे बिल काढणे अशी निविदा मध्ये अट असताना देखील त्याचे कोट्यवधीचे बोगस पॅचिग चे बिल काढण्यात आलेले आहे त्यामुळे नगर शहरातील खड्डे दिवाळीपूर्वी बुजविण्याची मागणी शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
Related Posts
1 of 1,512
यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, युवा सेनेचे शहर प्रमुख विक्रम राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, परेश लोखंडे, दीपक खैरे, विजय पठारे, काका शेळके, अमोल येवले, संग्राम कोतकर, अभिषेक भोसले, तारीक कुरेशी, सागर शहाणे, विशाल वालकर आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: