आमच्यावर खोट्या केसेस करण्यापेक्षा शहराचा विकास करावा – किरण काळे

0 249
 अहमदनगर –   अहमदनगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे ( Kiran Kale) यांच्यावर शहरातील आय टी पार्क मध्ये पाहणी करत असताना  एका महिलेला  शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.(The city should be developed rather than making false cases against us – Kiran Kale )
या प्रकरणाबद्दल खुलासा करण्यासाठी आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एका पत्रकार परिषदेचा आयोजन केला होता. या पत्रकार परिषदेत काळे यांनी सर्व बाबींचा खुलासा करत पाहणी वेळीचे सर्व चित्रिकरण पत्रकार परिषदेत दाखवले.
Related Posts
1 of 1,487
या बाबत थेट राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यावर निशाण साधत आमच्यावर खोट्या केसेस करण्यापेक्षा शहराचा विकास करावा आणि आय टी पार्क च्या मुद्द्यावर सामोरा समोर येऊन चर्चा करा, असे आव्हान केलं आहे. आमदारांचे गुंड कार्यकर्ते खोट्या केसेस करण्याचे उद्योग अनेक दिवसांपासून सुरू असून आम्ही या रावणरुपी गुंडांचे दहन माजी आमदार अनिल राठोड यांच्या विचारातून करणार असल्याचे किरण काळे यांनी स्पष्ट केले.(The city should be developed rather than making false cases against us – Kiran Kale )
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: