शेतीत दुसरा वाटेकरी नको म्हणून भावानेच केला सख्ख्या भावाचा खून

0 322

लातूर –  मागच्या पाच दिवसापूर्वी लातूर (Latur) मधील तांदुळजा गावातील नदीमध्ये बोटीच्या माध्यमातून एका झुडपात अडकलेला मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. हे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांसमोर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.(The brother killed his brother as he did not want another share in the farm)

18 एकर शेतीत (farm )दुसरा वाटेकरी नको म्हणून सख्ख्या लहान भावाचा मोठ्या भावाने मित्राच्या मदतीने हत्या (killed) केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.यासंदर्भात मयताचा मोठा भाऊ आणि त्याच्या मित्राला मुरुड पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तांदुळजा येथील शेतकरी हरिभाऊ उद्धवराव गायकवाड यांची 18 एकर शेती असून त्यांना विपिन (23) व विशाल (19) अशी दोन मुले आहेत. यातील विशाल हरिभाऊ गायकवाड हा 6 ऑक्टोबर रोजी शेतात झोपायला गेला होता. याचवेळी त्याच्यासोबत विशालचा मोठा भाऊ विपिन आणि विपिनचा मित्र विकास ढाणे हे सुद्धा शेतातच मुक्कामाला गेले होते. मात्र  दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल घरी परतलाच नाही. त्यामुळे त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. विशालचा कोठेच शोध लागला नाही. अखेर यासंदर्भात विशालेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरुड पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली.

हे पण पहा –  जमीर इनामदार यांचे हृदय विकराच्या झटक्याने निधन | देशसेवेत कार्यरत असताना निधन

Related Posts
1 of 1,622

मुरुड पोलिसांकडून बेपत्ता विशालचा शोध सुरू असतानाच, पोलिसांना विशालचा भाऊ विपिनयाच्यावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन  कसून चौकशी केली असता आपणच विशालचा खून केल्याची कबुली विपिनने पोलिसांना दिली. वडिलांच्या 18 एकर शेतीमध्ये दुसरा वाटेकरी नको म्हणून मीच रात्री झोपेत असलेल्या विशालच्या डोक्यात काठीने मारून त्याचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे मित्र विकास ढाणे याच्या मदतीने मृतदेहाला मोठमोठे दगड बांधून मृतदेह तट बोरगाव येथील पुलावरून मांजरा नदीत टाकल्याचेही त्याने कबूल केले.(The brother killed his brother as he did not want another share in the farm)

भाजपला हे लक्षात आल्यानेच …… ,  शरद पवार यांचा भाजपावर गंभीर आरोप

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: