मोबाईलवर खेळते म्हणून भावाने हटकलं; बहिणीने उचलं टोकाचं पाऊल..

0 210
The brother hesitated as he played on the mobile; Sister took the last step ..
 
मुंबई  –    मोबाईल (mobile) जास्त वापरते म्हणून मोठ्या भावाने (brother) हटकल्याने बहिणीने (Sister) टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील डोंबिवली परिसरात घडली आहे. किरण सहानी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. तिने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. शेलारनाका त्रिमूर्ती नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

 

Related Posts
1 of 2,427

समोर आलेल्या माहितीनुसार किरण मोबाईलवर नेहमी गेम खेळत बसायची त्यामूळे तिच्या मोठ्या भावाने जास्त मोबाईल बघू नकोस असे सांगत तिच्या मोबाईलचे सिमकार्ड काढून घेतलं आणि तो बाजूच्या घरात  गेला. काही वेळाने त्याने राहत्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र घरातून बहिणीने आवाज दिला नसल्याने त्याने घरातील खिडकीतुन पाहिले असता किरण हिने छताच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचं दिसलं. भावाने तात्काळ आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतलं, लोकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पण तोपर्यंत किरणचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.

 

 

घरातील इतर सदस्य उत्तरप्रदेशात आपल्या गावी गेले होते. त्यामुळे भाऊ विक्रम आणि बहिण किरण सहानी हे दोघंच घरात होते. विक्रम वर्क फ्रॉम होम करत होता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: