दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने केला आपल्या आईचा खून , आरोपीला अटक

0 219

पुणे – आपल्या आई(Mother) ने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने आईला हातातील कड्याने, सुरी, लाकडी दांडक्याने मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी आरोप मुलागा सचिन दत्तोपंत कुलथे यास अटक केली आहे. तर विमल दत्तोपंत कुलथे (वय ६०) असे खून झालेल्या आईचे नाव आहे.(The boy killed his mother for not paying for alcohol during the day, the accused was arrested)

याप्रकरणी अनिता मोहन चिंतामणी यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी सचिन आणि त्याची आई विमल कुलथे हे घरात दोघे जण राहत होते. सचिन याला दारु पिण्याचे व्यसन असल्याने त्याची पत्नी त्याला एक वर्षापूर्वी सोडून माहेरी निघून गेली होती. चालक म्हणून काम करणारा सचिन मागच्या काही दिवसांपासून बेरोजगार असल्याने आपला व्यसन पुर्ण करण्यासाठी तो नेहमी आपल्या आईकडे पैशाची मागणी करत असे. दारुसाठी पैसे न दिल्याने शुक्रवारी दसर्याच्या दिवशी त्याने आईला सुरीने व लाकडाच्या दांडक्याने मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला.

हे  पण पहा –  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या… | आ. मोनिका राजळे आक्रमक

Related Posts
1 of 1,487

त्यानंतर त्याने फिर्यादी बहिणीला याची माहिती दिल्याने ही घटना समोर आली. घटनेनंतर तो फरार झाला होता. आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अनिता चिंतामणी यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला स्वामी नारायण मंदिराजवळ असणाऱ्या टेकडी परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.(The boy killed his mother for not paying for alcohol during the day, the accused was arrested)

पिंपरीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा, मात्र अजित पवार गैरहजर चर्चांना उधाण..

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: