आई-बहिणीला त्रास दिल्याने मुलाने केली आपल्या बापाची हत्या, आरोपीला अटक

0 179

बुलडाणा –    दारु पिण्यासाठी पैसे मागून आई आणि बहिणींना त्रास देत असल्याच्या रागातून मुलाने पॅरोल (Parole) वर सुटून आलेल्या आपल्या बापाची हत्या (killed) केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील (Buldana district) संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दखल करून दोघांना अटक केली आहे. (The boy killed his father for harassing his mother and sister and the accused was arrested)

काही दिवसांपूर्वी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील संगीत इंगळे या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. संग्रामपूर ते वरवट मार्गावर मधुकर बकाल यांच्या शेताजवळ पहाटे तामगाव पोलिस हे गस्तीवर असताना त्यांना मृतदेह सापडला होता. मृतदेहाचा पंचनामा करुन ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी दिवसभर चौकशी केली असता दारू पिऊन कुटुंबाला त्रास देणार्‍या वडिलांचा मुलाने साथीदारासोबत तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचे समोर आले. तात्काळ या घटनेची तपास चक्र फिरवले असता श्वान पथक पाचारण करण्यात आले.

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Related Posts
1 of 1,481

मयत संगीत राजाराम इंगळे (वय 49) याचा मुलगा विपुल संगीत इंगळे याला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता माझा बाप दारु पिऊन मारहाण करून त्रास देत होता, याच त्रासाला कंटाळून लाकडी दांड्याने मारुन त्याला ठार केले. मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळवून साथीदार राजेश भाटकर याच्या मदतीने मोटारसायकलच्या साहाय्याने गावाबाहेर नेऊन फेकून दिल्याचे त्याने कबूल केले. (The boy killed his father for harassing his mother and sister and the accused was arrested)

समीर वानखेडे यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप , पत्नी क्रांती रेडकर ने दिली ही प्रतिक्रिया

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: