आत्महत्या केलेल्या ग्रामसेवक गवांदेंचे शव आठवड्याने आढळले.!

0 319

श्रीगोंदा :-  श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील रहिवासी असलेल्या ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे (Gramsevak Jhumbar Muralidhar Gawande)  यांनी काही दिवसांपूर्वी रामेश्वर धबधब्यामध्ये उडी घेतली होती. मात्र, आत्महत्या केल्यानंतर त्यांचे शव मिळालेले नव्हते. घटनेनंतर तब्बल आठ दिवसानंतर त्यांचा मृतदेह शनिवारी नदीमध्ये तरंगताना आढळून आला. पाटोदा पोलिस, आपत्ती व्यवस्थापनाचे जवान, ग्रामस्थ तसेच, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित कारवाई करूनही हा मृतदेह सापडत नव्हता.

प्रकरण काय 
मांडवगण येथील ग्रामसेवक झुंबर गवांदे यांनी दिनांक २४ सप्टेंबर रोजी पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्यावरून उडी मारून येथील दरीत आत्महत्या केली होती. यानंतर पोलिसांनी दरीत गवांदेंचा मृतदेह शोधण्यासाठी शोध मोहीम सुरु केली होती. मात्र, त्यांच्या मृतदेहाचा तपास लागत नव्हता. दरम्यान शनिवारी तब्बल आठ दिवसानंतर त्यांचा मृतदेह नदीत आढळला.
Related Posts
1 of 1,481

गवांदे हे तालुक्यातील मांडवगण येथील रहिवासी होते. त्यांच्या गावाच्या जवळच असणाऱ्या खांडगाव येथे ते कर्तव्यावर असत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील धबधब्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याने. श्रीगोंदा व पाटोदा तालुक्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पोलीस प्रशासन गवांदे यांचा शोध घेत होती. मात्र, त्यांना यश येत नव्हते. सतत चालू असलेल्या पावसामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले होते. शेवटी आठवड्यानंतर ग्रामसेवक गवांदे यांचा मृतदेह येथील दरीत आढळून आला.

 हे पण पहा – श्रीगोंदा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: