रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी, IRCTC ने तिकीट बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या ‘त्या’ बद्दल

0 290
The biggest news for train passengers, IRCTC changed the rules of ticket booking; Learn about 'that'

 

दिल्ली –  देशातील बहुतेक नागरिक प्रवासासाठी नेहमी रेल्वेचा (Railways) वापर करतात. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्य नागरिकांसाठी किफायतशीर असल्याने दररोज लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. मात्र आता  रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम जाहीर केले आहे. जे प्रवाशी ऑनलाइन तिकीट बुक करतात त्यांच्यासाठी ही बातमी फायदेशीर ठरणार आहे. अॅप आणि वेबसाइटद्वारे तिकीट बुक करण्याचे नियम IRCTC ने बदलले आहेत. नवीन नियम लागू झाल्यानंतर कोट्यवधी वापरकर्त्यांना त्यांचे खाते वेर‍िफाई (Verify) करावे लागेल.

मोबाईल आणि ई-मेल आयडीची पडताळणी आवश्यक
भारतीय रेल्वेची उपकंपनी IRCTC ने जारी केलेल्या नियमांनुसार, वापरकर्त्यांना तिकीट बुक करण्यापूर्वी मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीची पडताळणी करणे आवश्यक आहे. आता ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक पडताळणीशिवाय ऑनलाइन तिकीट बुक करता येणार नाही.

Related Posts
1 of 2,326

अशा प्रवाशांसाठी हा बदल लागू होणार आहे
हा बदल अशा प्रवाशांसाठी लागू होईल ज्यांनी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत अॅप किंवा वेबसाइटद्वारे तिकीट बुक केले नाही. जर तुम्ही खूप दिवसांपासून तिकीट काढले नसेल तर प्रथम वेर‍िफाई प्रक्रिया पूर्ण करा, हे अगदी सोपे आहे. असे केल्याने तुम्हाला तिकीट काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

 

 

मोबाईल नंबर आणि ई-मेल वेर‍िफाई कसे करावे
IRCTC अॅप किंवा वेबसाइटवर जा आणि वेर‍िफाई विंडोवर क्लिक करा.
येथे तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी टाकावा लागेल.
दोन्ही माहिती प्रविष्ट केल्यानंतर, वेर‍िफाई बटणावर क्लिक करा.
Verify वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो टाका आणि मोबाईल नंबर वेर‍िफाई करा.
त्याचप्रमाणे ई-मेल आयडीवर मिळालेला कोड टाकल्यानंतर तुमचा मेल आयडी पडताळला जाईल.
आता तुम्ही तुमच्या खात्यातून कोणत्याही ट्रेनसाठी ऑनलाइन तिकीट बुक करू शकता.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: