समीर वानखडे यांच्या बद्दल सर्वात मोठा दावा, अडचणीत वाढ होण्याची शक्यता

0 293

नवी मुंबई –    राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लावलेल्या आरोपामुळे आधीच अडचणीत आलेल्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लिम असल्याचा दावा त्याचा पहिला निकाह (Marriage) लावणारे काझी मुजम्मिल अहमद यांनी  केला आहे. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.(The biggest claim about Sameer Wankhade, the possibility of an increase in difficulty)

पत्रकारांशी बोलताना काझी मुजम्मिल अहमद म्हणाले कि समीर वानखेडे हे मुस्लिम होते. जर हिंदू असल्याचं सांगितलं असतं तर मी निकाह लावून दिलाच नसता. समीर मुसलमान होता, त्याचे वडील दाऊद मुसलमान होते, शबाना मुसलमान होती आणि तिचे वडिलही मुस्लिम होते. निकाहनामा सुद्धा हा बरोबर आहे. लोखंडवाला येथील एका हॉलमध्ये हा निकाल मोठ्या उत्साहात पार पडला होता.

यापूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवली आहे. एका होतकरू तरुणाची नोकरी समीर वानखेडेंनी हिरावली आहे. धर्मावरुन राजकारण करण्याचा माझा हेतू नाही. समीर वानखेडे याने बनावट जात प्रमणपत्र बनवून नोकरी मिळवली आहे. वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांना धमकावण्यात येत आहे असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केला आहे.

राष्ट्रवादीचा भाजपाला दे धक्का ,भाजपचे २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Related Posts
1 of 1,635

दरम्यान  काझी मुजम्मिल अहमद  यांनी केलेल्या या दाव्यावर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी म्हटलं, मौलाना खोटं बोलत आहेत. प्रभाकर साईल याच्याप्रमाणेच मौलानांनाही फोडण्यात आले आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात मी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार असून न्यायालयात धाव घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (The biggest claim about Sameer Wankhade, the possibility of an increase in difficulty)

हे पण पहा – येसवडी गावातील अनाधिकृत हातभट्टी आणि दारु विक्रीवर कारवाई व्हावी

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: