निलेश लंके यांच्या जीवनावर येतोय आखाडा लवकरच रुपेरी पडद्यावर…..

0 488

अहमदनगर –  पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे, ‘आखाडा’ असं या चित्रपटाचे शीर्षक असणार आहे. निलेश लंके यांच्या जीवन प्रवासाचा ‘आखाडा’ हा रुपेरी पडद्यावर येणार असल्याने अनेकांना उत्सुकता लागली आहे.

या चित्रपटाचे स्क्रिप्ट पूजन आणि नावाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी श्रीमान योगी ग्रंथाचे पारायण, त्रिकाल संध्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती, तीन तास श्री गणेश हवन आमदार लंके यांच्या मातापित्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच पाच दिवस स्क्रिप्ट पूजन आणि नावाचा घोषणेचा असा भव्य दिव्य कार्यक्रम होत आहे. यानिमित्त श्री गणेश , माता वैष्णो देवी , मोहटादेवी, आई तुळजाभवानी माता यांच्या प्रतिमेचे पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाअभिषेक करून चित्रपटाच्या स्क्रिप्टचे पूजन आणि नावाची घोषणा करण्यात आली. संत निळोबाराय यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पिंपळनेर नगरीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Related Posts
1 of 1,540
श्रीमान योगी ग्रंथाचे यावेळी अभिनेत्री ,कोरिओग्राफर अश्विनी इरोळे यांनी सलग चार दिवस पारायण करून हा ग्रंथ वाचून पूर्ण केले.’आखाडा’ या चित्रपटाचे लेखक  दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे हे असून चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. अश्वयुग फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट बनत आहे. चित्रपटाच्या गाण्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दरम्यान स्क्रिप्ट पूजन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण लोंढे यांनी केले, नियोजनासाठी अश्वयुग इव्हेंट मॅनेजमेंटने नियोजन केले, चित्रपटात काम करणारे कलाकार हे हिंदी, तेलगू आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कलाकार आहेत.अहमदनगर जिल्हा, वैष्णवदेवी, मुंबई ,दिल्ली आणि काही दृष्य भारताच्या बाहेर चित्रित केले जाणार आहेत.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: