मोठी बातमी! तालिबान कडून विमानतळ बंद, नागरिकांची सीमेकडे धाव

0 239

काबूल-  संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये आपला नियंत्रण आणल्यानंतर तसेच अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तान सोडल्यानंतर आता तालिबान लवकरच आपली सत्ता प्रस्थापित करणार आहे.

अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडताच तालिबाननं काबूल विमानतळावर कब्जा करुन विमानतळच बंद केल्याची माहिती समोर आली आहे. तालिबान कडून विमानतळ बंद केल्याने अफगाणिस्तान सोडणार या नागरिकांनी अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या सीमेकडे धाव घेतली आहे.

अफगाणिस्तानातील नागरिक देश सोडण्यापूर्वी बँकातील आपले पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर प्रचंड गर्दी करत आहेत. पण, त्यांना बँकांनी पैशांचे व्यवहार बंद केल्यामुळे नागरिकांना पैसेही मिळण्यात अडचणी येत आहेत. यावरुन तालिबानच्या येण्याने देशावर किती मोठं आर्थिक संकट आलंय, हे कळेल.

“या” कारणाने भारतात व्हॉट्सअ‍ॅपने ४६ दिवसात बंद केली ३० लाख अकॉउंट

Related Posts
1 of 1,640

इराणच्या सीमेला प्रचंड गर्दी
तालिबाननं काबुल विमानतळ बंद केल्यामुळे अफगाणिस्तान आणि इराण दरम्यान असलेल्या इस्लाम काला बॉर्डर पोस्टवर मोठ्या संख्येनं अफगाणी नागरिक जमा होत आहेत.

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: