आंदोलनाच्या ईशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग …..

0 11

 श्रीगोंदा –  सर्व ग्रामसेवकांनी तालुक्यातील ज्या गावामध्ये शासकीय जागेवर,गायरान,गावठाण याठिकाणी निवासाच्या हेतूने ज्या लोकांनी घरे बांधली आहेत त्या घरांचे नियमांकुल करण्यासाठी ऑनलाइन,ऑफ लाईन मागणी अर्ज दाखल करावेत असे लेखी आदेश गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी काढले असून दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस कडे तक्रारी आलेल्या गावातील अतिक्रमणाचा पंचनामा करण्यास सुरूवात केली.अतिक्रमण नियमांकुल करण्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत परंतु त्या सोडविण्याचे आश्वासन काळे यांनी एन.डी.एम.जे.ला दिले आहे

श्रीगोंदा तालुक्यातील शासकीय जागेवरील निवासी हेतूने केलेले अतिक्रमण नियमांकुल करावे व अतिक्रमण धारकांची नावे अपलोड करताना दुजाभाव करू नये अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) च्या कार्यकर्ता तथा उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्या मिराताई शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर गटविकास अधिकारी काळे यांनी आज दि१५ मार्च रोजी चर्चा करण्यासाठी मिराताई शिंदे यांना दूरध्वनी वरून निमंत्रण दिले त्यानुसार आज सकाळी गटविकास अधिकारी यांच्या दालनात बैठक झाली त्यावेळी काळे बोलत होते.शिंदे यांनी वांगदरी, ढवळगाव,सांगवी दु.,लिंपणगाव,चिभळा या गावातील समस्या मांडल्या.ढवळगाव मध्ये दिनांक१५ रोजी पंचनामा करून याद्या अपलोड करण्यात आल्या.

जिल्ह्यामध्ये 78 ठिकाणी हॉस्पॉट तरपालिकेच्या हद्दीत आठ ठिकाणी कॅंटोनमेंट झोन- जिल्हाधिकारी

Related Posts
1 of 1,301

यावेळी एन.डी. एम.जे चे सचिव ऍड वैभव गीते यांच्याशी दूरध्वनी वरून गटविकास अधिकारी यांची चर्चा झाली. मुदत १५ मार्च असली तरी राहिलेल्या गावातील अतिक्रमण नोंद घेण्यासाठी अतिक्रमण धारकांनी ऑफ लाईन अर्ज लवकरात लवकर देण्याचे आवाहन मिराताई शिंदे यांनी केले असून लिंपणगाव येथील अतिक्रमण या विषयावर उपविभागीय अधिकारी यांच्याशी गुरुवारी दिनांक १८ मार्च रोजी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे काळे यांनी सांगितले.यावेळी अतिक्रमण विस्तार अधिकारी जगताप,भोंग तसेच राजेंद्र राऊत,लता सावंत, गणेश दिवेकर उपस्थित होते.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: