तारक मेहता मधील अभिनेत्री ने केला खुलासा.., म्हणाली त्याने केली शरीरसुखाची मागणी

0 1,221
 नवी मुंबई –   तारक मेहता का उल्टा चश्मा (Tarak Mehta’s Ulta Chashma) ही मालिका मागच्या १२ वर्षांपासून देशातील नागरिकांचा मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जवळपास सर्वच कलाकार लोकप्रिय झाले आहे. या लोकप्रिय कलाकारांमध्ये एक नाव म्हणजे अभिनेत्री आराधना शर्मा (Actress Aradhana Sharma) होय.  एका वेब साईट ला दिलेल्या मुलाखत नंतर सध्या आराधना चर्चेत आहे. त्यांनी या वेब साईटला दिलेल्या मुलाखती मध्ये तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक घटना सांगितली आहे. ही घटना ऐकूण सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.
या मुलाखतीमध्ये तिने सांगितलं की जेव्हा ती पहिल्यांदा तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेली होतीय तेव्हा त्याने तिच्याकडे शरीरसुखाची डिमांड केली होती. यासाठी आराधना तयार नव्हती. परंतु तो मुलगा बळजबरी करत होता. त्याने तिला किस करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, आराधनाने सरळ नाही सांगत म्हणाली, नाही म्हणजे नाही… या मुलाखतीनंतर सध्या ती सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
दरम्यान या पूर्वी त्यांनी एक मुलाखतीत  कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला होता. तिल्या १९ व्या वर्षी कास्टिंग काउचचा सामना करावा लागल्याचं सांगितलं आहे. एका कास्टिंग एजंटने आराधनासोबत केलेल्या त्या कृत्यामुळे तिला आता अनेक पुरुषांवर विश्वास ठेवणं कठिण जात असल्याचं ती या मुलाखतीत म्हणाली.
Related Posts
1 of 85
ही घटना मी आयुष्यभर विसरू शकत नाही. चार पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. तेव्हा मी पुण्यात शिक्षण घेत होते. यावेळी मी थोडफार मॉडेलिंग देखील करायचे. मुंबईतील एक व्यक्ती एका प्रोजेक्टसाठी कास्टिंग करत असल्याचं मला कळालं. मात्र त्याला आणखी काही रोल कास्ट करायचे असल्याने आम्ही रांचीतील माझ्या मूळ गावी भेटलो. आम्ही स्क्रिप्ट वाचत होतो आणि त्याने मला विचित्रपणे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. असं आराधना म्हणाली.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: