दरोडा, जबरी चोरीतील फरार आरोपी जेरंबद…

0 27
श्रीगोंदा  :-  दिनांक १२ मार्च रोजी रात्री ११:०० वा ते दिनांक १३ मार्च रोजी पहाटे ०५.०० वाजनेच्या दरम्यान पोलिस अधिक्षक श्री. मनोज पाटील सो. यांनी जिल्ह्यात नाकाबंदी कोबींग ऑपरेशन राबविण्याच्या आदेशानुसार श्रीगोंदा पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस पथकासह कोबींग ऑपरेशन गुन्हेगार वस्ती, येळपणे, चिंभळा, मढेवडगाव परिसरात केली असता, रेकॉर्डवरिल सराईत अट्टल दरोडेखोर शंभु कुंज्या चव्हाण वय ३५ वर्षे रा.सुरेगाव, ता.श्रीगोंदा हा येळपणे शिवारात मिळुन आला.

 

बोठे याच्या खिशात पोलिसांना सापडली सुसाईड नोट 

Related Posts
1 of 1,292

त्याचे बाबत माहिती घेतली असता, तो बेलवंडी पो.स्टे.च्या भादविक. ३९९, ४०२, ३९४, ३९५ प्रमाणे दाखल गुन्ह्यात फरार होता. तसेच, त्याचेवर सण २०१६ ते २०२० पर्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रमाणे सदर आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी पुढील कारवाई कामी बेलवंडी पोलिस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.

पत्रकार बाळ बोठेला व्हीआयपी ट्रीटमेंट ?

सदरची कारवाई ही (पोलिस अधिक्षक) मनोज पाटील सो, (अप्पर पोलिस अधिक्षक) सौरभ कुमार आग्रवाल सो, (उपविभागीय पोलिस अधिकारी) आण्णासाहेब जाधव सो. यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे (पोलिस निरीक्षक) रामराव ढिकले, (सपोनि) दिलीप तेजनकर, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ गोकुळ इंगावले, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादा टाके, यांनी केली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: