चक्क ! राज्यपालांच्या हवाई प्रवासाला राज्य सरकारने नाकारली परवानगी  

0 23
नवी मुंबई –   राज्य सरकार आणि राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात मागच्या काही दिवसांनी वाद सुरु आहे. कोणत्याना कोणत्या कारणाने राज्यसरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद होत सुरूच असते.  मागच्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारने विधानपरिषदेची १२ उमेदवारांची यादी राज्यपालांना दिली होती मात्र राज्यपालाने ती यादी आता पर्यंत मंजूर केली नाही याच मुद्यावरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद सुरु असताना आणखी एक वाद समोर आला आहे.

अनधिकृत बांधकाम  प्रकरणी याचिका कंगना रानौत कडून मागे 

 राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली .
Related Posts
1 of 1,321

उदयनराजे यांच्या भेटी नंतर नाना पटोले म्हणाले जस्ट वेट अँड वॉच 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद आलाच नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य  सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला राज्य सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे.यामुळे राज्यपाल आणि राज्यसरकार यांच्यात आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांना फक्त प्रदेशाध्यक्ष पद तर विधानसभा अध्यक्षपदासाठी थोपटेंचं नाव चर्चेत ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: