भीषण अपघात: स्लीपर बसला आग, सात प्रवासी जिवंत जळाले

0 460

 

मुंबई – दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातून एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. येथील एसी बसला आज सकाळी आग लागली. त्यामुळे बसमधील सात प्रवासी जिवंत जाळले. सुमारे डझनभर प्रवासी गंभीररीत्या भाजले. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात हा अपघात झाला. एसी बस हैदराबादला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

बीदर-श्रीरंगपटना महामार्गावर कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापूर तालुक्याच्या हद्दीत सकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बस गोव्याहून हैदराबादला जात होती. या घटनेच्या संदर्भात, पोलिस सूत्रांनी सांगितले की, बस एका लॉरीला धडकल्यानंतर पेट घेतली. अपघाताच्या वेळी बसमध्ये 35 हून अधिक प्रवासी होते.

 

Related Posts
1 of 2,190

अपघाताला बळी पडलेली एसी बस गोव्याच्या ऑरेंज कंपनीची होती. या धडकेनंतर बसमध्ये एवढी मोठी आग लागली होती की, स्थानिकांना बसच्या जवळही जाता आले नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी अग्निशमन दलासह दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: