अहमदनगर जिल्ह्यात भिषण अपघात

0 10

अहमदनगर –  जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भिषण अपघात झालाय. बोटा गावातील बाह्यवळण पुलावरून कार खाली कोसळल्याने चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. पुणे नाशिक महामार्गावर बोटा गावात असलेल्या बाह्यवळण पुलावरून गाडी थेट खाली कोसळली यात गाडीचा चक्काचूर झाला असून चारजण जखमी झाले आहेत. यातील एकाची परीस्थिती गंभीर आहे.

शनिवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता हि घडली आहे या भिषण अपघातात कारचा अक्षरशा चक्काचूर झालाय. घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कार मधून जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णवाहिकेतून संगमनेर आणी आळेफाटा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे हा अपघात इतका भिषण होता की कारचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे .

Related Posts
1 of 1,290

या कारमध्ये दोन तरूण आणी दोन तरूणी असल्याची माहिती आहे.. हे सर्वजण कुठे राहणारे आहेत याबद्दल माहीती मिळाली नाही.अपघात कशामुळे झाला याबाबतही काही माहिती अद्याप मिळाली नाही.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: