आयपीएल मध्ये दिसणार आठ ऐवजी दहा संघ, बीसीसीआयने जाहीर केले टेंडर

0 175

नवी मुंबई-  कोरोना विषाणूच्या वाढता प्रभाव पाहता थाबवण्यात आलेल्या आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांना येत्या 19 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. आयपीएल 2021 च्या उर्वरित सर्व सामने युनायटेड संयुक्त अमीरात येथे खेळविले जाणार आहे.

याच दरम्यान बीसीसीआयने आयपीएलच्या पंधराव्या सत्र ची तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलच्या पंधराव्या सत्रात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये आठ ऐवजी दहा संघाचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी बीसीसीआयने निविदा जाहीर केली आहे. आयपीएल मध्ये नव्याने शामिल होणाऱ्या दोन नव्या संघांपैकी एका संघाच्या मालकी आणि संचालन करण्यासाठी बीसीसीआयने निविदा जाहीर केली आहे. तसेच आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने निविदा प्रक्रियेद्वारे बोली आमंत्रित केल्या आहेत.

हे पण पहा –  आमदार निलेश लंके यांच्या कामाचं राज्यमंत्री आदिती तटकरेंकडून कौतुक

बोली सादर करताना काही नियम आणि अटी घालण्यात आले आहेत. यात पात्रता सिद्ध करणे, बोली सादर करण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन संघांचे अधिकार आणि दायित्वे इत्यादी ‘निविदा आमंत्रण’मध्ये समाविष्ट आहे, जे नॉन-रिफंडेबल शुल्काची भरपाई मिळाल्यावर उपलब्ध केले जातील. नॉन-रिफंडेबल शुल्क १० लाख रुपये इतके असेल. तसेच यात वस्तू आणि सेवा कराचाही समावेश आहे. ‘निविदा आमंत्रण’ ५ ऑक्टोबरपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Related Posts
1 of 58

इच्छुक उमेदवारांनी ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करण्यासाठी बीसीसीआयने मेल करण्यास सांगितले आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार बोली सादर करू इच्छिणाऱ्या कोणत्याही इच्छुक उमेदवारास ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच ‘निविदा आमंत्रण’मध्ये निर्धारित केलेले पात्रता निकष पूर्ण करणारे आणि त्यामध्ये निर्धारित केलेल्या इतर अटींची पात्रता पूर्ण करणारेच बोली लावण्यास पात्र असतील.

“या” कारणाने भारतात व्हॉट्सअ‍ॅपने ४६ दिवसात बंद केली ३० लाख अकॉउंट

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: