टेम्पोची दुचाकीला धडक,युवतीचा मृत्यू; गुन्हा दाखल

0 198
Accident in Shrigonda taluka, one killed on the spot, case filed against unknown driver

 

अहमदनगर – टेम्पोची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवतीचा मृत्यू झाला आहे. स्वरांजली शिवाजी शिंदे (वय १६ रा. केडगाव) असे मयत युवतीचे नाव आहे. अहमदनगर-पुणे रोडवरील इम्पेरियल चौकात हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

स्वरांजलीचे वडिल शिवाजी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. स्वरांजली ही तिच्या काकाची दुचाकी घेऊन अहमदनगर-पुणे रोडवरून केडगावच्या दिशेने जात असताना इम्पेरियल चौकात तिच्या दुचाकीला टेम्पोने धक्का दिला.

 

Related Posts
1 of 2,107

जखमी स्वरांजलीला शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: