DNA मराठी

ज्यांना शिव्या घालायच्यात त्यांना.., ‘रानबाजार’च्या बोल्ड सीनवर तेजस्विनी पंडितचं स्पष्टीकरण

0 424
 मुंबई –     सध्या सोशल मीडियावर (Social Media) ‘रानबाजार’ (Ranbazar) या वेबसीरिजची चांगलीच चर्चा रंगली आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री(Actress) प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले आहे. यामुळे सध्या दोघींना सोशल मीडियावर खूप ट्रॉल केला जात आहे.   याच ट्रोलिंगवर आता अभिनेत्री तेजस्विनी पंडितने भाष्य करत ट्रोलिंग करणाऱ्यांना उत्तर दिला आहे.
Related Posts
1 of 2,567
 यावेळी ती म्हणाली, “मला वैयक्तिक या गोष्टींचा त्रास कधीही होत नाही. याच्या आधी झाला नाही. आताही होत नाही. याच्यानंतरही कदाचित होणार नाही. कारण मी त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कारण मी त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मला असं वाटतं जोपर्यंत चर्चा होतेय, ते लोकांपर्यंत पोहोचतंय तोपर्यंत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह या गोष्टी कायम असतात. त्याकडे फार लक्ष न देता आपल्याला त्यातील जे चांगलं वेचून घ्यायचं आहे ते वेचून घ्यायचं आणि पुढे निघायचं”, असेही तिने म्हटले.

 

 

“कारण ज्यांना शिव्या घालायच्या आहेत, ते फक्त टिझरवर किती वेळ शिव्या घालणार आहेत. त्यांना त्यासाठी सिरीज बघावी लागेल ना… ती बघितल्यानंतर कोणालाच शिव्या घालाव्या असे वाटणार नाही. कारण तशाप्रकारची ही कलाकृती नाही”, असे स्पष्ट मत तेजस्विनीने मांडले.

 

 

संवेदनशील विषय हातळण्यात हातखंड असलेले दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच त्यांनी या वेबसीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका देखील साकारली आहे. अभिजित पानसे दिग्दर्शित क्राईम थ्रीलर वेबसीरिजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स यांनी केली आहे. ‘रानबाजार’ येत्या २० मे पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर प्रेक्षकांना पाहता येईल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: