तहसीलदार यांनी केली धडाकेबाज कारवाई ,लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

0 462
श्रीगोंदा :-  तहसीलदार पवार यांची तडकाफडकी बदली झाल्यानंतर सर्व सूत्रे अप्पर तहसीलदार श्रीगोंदा चारुशीला पवार (Charushila Pawar) यांचे हाती आली त्यानुसार त्यांनी एक पथक तयार करूनपथकाची पेडगाव येथील अवैध वाळू तस्करी करणाराविरोधात धडाकेबाज कारवाई केली आहे. (Tehsildar takes action, seizes property worth lakhs of rupees)
दिनांक 16 आगस्ट रोजी संध्याकाळी 9 वाजता अज्ञात व्यक्तीकडून मिळालेल्या खबरीनुसार मौजे पेडगाव येथे अवैध वाळू उपसा होत असल्याचे अप्पर तहसीलदार श्रीगोंदा यांना समजले. त्यानुसार त्यांचे भरारी  पथकाने मौजे पेडगाव येथे छापा टाकला असता 3 अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक ताब्यात घेतल्या आहेत. सदर वाहने पुढील दंडात्मक कारवाई साठी तहसील कार्यालयाचे आवारात लावली आहेत. वाळू तस्करांनी एक वाहन चिखलात फसवले होते परंतु श्रीम. चारुशीला पवार यांचे पथकाने रात्री 1 वाजेपर्यंत अथक प्रयत्न करून सदर वाहन बाहेर काढले व तहसील कार्यालयात दंडात्मक कारवाई साठी लावले.
Related Posts
1 of 1,486
सदर पथकात अप्पर तहसीलदार श्रीम. चारुशीला पवार यांचे समवेत महसूल नायब तहसीलदार योगिता ढोले, महसूल सहाय्यक, सतीश घोडेकर, मंडळ अधिकारी साबळे, तलाठी मापारी, मोरे, शिपाई स्वप्नील सुद्रीक तसेच चालक विशाल अरुण तसेच पोलीस कर्मचारी गोरे व भोर यांचा समावेश होता. भविष्यात देखील अश्याच प्रकारे अवैध वाळू उत्खनन/वाहतूक बाबत बाबत कडक कारवाई सुरू ठेवणार असल्याचे चारुशीला पवार यांनी सांगितले. (Tehsildar takes action, seizes property worth lakhs of rupees)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: