तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आँडिओ क्लिपमुळे खळबळ , दिला आत्महत्याचा इशारा

0 1,074

अहमदनगर – वनअधिकारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांनी मागच्या काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती त्यांना उद्देशून पारनेरचे तहसीलदार लेडी दबंग नावाने ओळखले जाणारे ज्योती देवरे ( Jyoti Deore)  यांचा एक आँडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या किल्पमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आपल्या या किल्पमध्ये ते दिपाली मी लवकरच तुझ्याकडे  येत असल्याचे सांगत महिला म्हणून प्रशासनात कसा छळ होतो तसेच लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना कसा त्रास देतात.आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी आपल्या व्हायरल किल्पमध्ये केला आहे . (Tehsildar Jyoti Deore’s audio clip caused a stir and warned of suicide)

कोवीड लसीकरणावरुन पारनेरचे  एका लोकप्रतिनिधी नी आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती मात्र नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली होती  याचा देखील उल्लेखही देवरे यांनी   केला आहे. आपल्या विरुद्ध विधीमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीच्या चालकाकडून लिहून घेणं, अँट्रोसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी देणे असे अनेक प्रकार घडल्याने देवरे यांनी क्लिपमध्ये नमूद केले आहे. आपल्या मुलांकडे पाहून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलण्याचा विचार कधीकधी येतो. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हे पाऊल उचल्याचे देवरे यांनी म्हटलं आहे.

धक्कादायक ! सुनेच्या छळाला कंटाळून सासऱ्याने केली आत्महत्या

Related Posts
1 of 1,608

तहसीलदार ज्योती देवरे आपल्या ११ मिनिटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतात कि  प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खर तर तु या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सुसाईड नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावले होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद गा मी पण तेच पालुपद गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा पण या चिमुकल्या पंख्यात आता त्राण राहिले नाही. तत्वांना मुरड घालून जगता येत नाही. त्यांचे हुजरी करत तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी धुंकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला खता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडित गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडित साहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाक. पण आपल्या चाकांना जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा.(Tehsildar Jyoti Deore’s audio clip caused a stir and warned of suicide)

हे पण पहा – नगर पोलिसांची राज्यात प्रथम ई-टपाल(E-TAPAL)कार्यप्रणाली सुरु

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: