तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणावर अण्णा हजारे म्हणाले …..

0 647

अहमदनगर –  पारनेर तहसीलदार ज्योती देवरे (Jyoti Deore ) यांची आत्महत्या देणारी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यभरात एकाच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये तहसीदार ज्योती देवरे नाव न घेता पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप करताना दिसत आहे.

हा ऑडिओ क्लिप मध्ये व्हायरल होताच पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांची भेट घेतली होती. तर दुसऱ्या दिवशी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनीही अण्णांची भेट घेतल्या नंतर काही प्रसारमाध्यमांवर  उलटसुलट बातम्या येत होत्या.  या प्रकरणावर बोलताना अण्णा म्हणाले ते त्यांचे व्यक्तिगत प्रकरण आहे. त्यात मला पडायचं नाही मात्र ज्योती देवरे यांना मी सांगितले आत्महत्येचा विचार सोडून तुम्हाला काय कराचे ते करा मात्र आत्महत्येचा विचार करू नका असा सल्ला त्यांना अण्णा हजारे यांनी दिला.
Related Posts
1 of 1,518
ऑडिओ क्लिप मध्ये काय 
तहसीलदार ज्योती देवरे आपल्या ११ मिनिटाच्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतात कि  प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खर तर तु या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सुसाईड नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावले होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद गा मी पण तेच पालुपद गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा पण या चिमुकल्या पंख्यात आता त्राण राहिले नाही. तत्वांना मुरड घालून जगता येत नाही. त्यांचे हुजरी करत तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी धुंकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला खता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडित गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडित साहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाक. पण आपल्या चाकांना जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: