“त्या” व्हायरल किल्पवर तहसीलदार ज्योती देवरे म्हणाले होय ! ती क्लिप माझीच..

0 261

अहमदनगर –  सोशल मीडियावर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील तहसीलदार ज्योती देवरे (Tahsildar Jyoti Deora) यांची एक ऑडिओ किल्प व्हायरल झाली होती या ऑडिओ किल्पमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. या किल्प मध्ये तहसीलदार  ज्योती देवरे आत्महत्या करण्याचा इशारा देत होते. या किल्प व्हायरल झाल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र आता पहिल्यांदा मीडियाशी संवाद साधत त्या किल्पबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “होय ती क्लिप माझीच. मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मी या प्रकरणात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले होते. आजही पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एका महिलेचा मनोबल खच्चीकरण करण्यासाठी सगळे एकत्र आले याचं मला दुःख” असं म्हणत तहसीलदार ज्योती देवरे  यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.(Tehsildar Jyoti Deora said that “those” Viral clip ..)

तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले कि व्हायरल झालेली क्लिप ही चुकीने झाली आहे. एक फोन आला होता, 2 तासात तुमच्या बाबतीत काही तरी घडणार आहे, त्यामुळे मी दुखी झाले आणि मला धक्का बसला, निगेटिव्ह विचार मनामध्ये आला. आणि त्यानंतर मनातल सर्व लिहिलं आणि कोरोनातील नेहेमीच्या सवयी प्रमाणे क्लिप तयार करायला घेतलं आणि रडायला आल्याचंही ज्योती देवरे यांनी सांगितलं. ज्योती देवरे यांनी वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी यांना भेटून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची देखील भेट घेतल्याचं ज्योती देवरे सांगतात. त्याच बरोबर भावाच्या मित्राकडून क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये आले, त्यामुळे मी 2 दिवस कोणाशी च बोलले नसल्याचं ज्योती देवरे यांनी सांगितले.

जिल्ह्यात आज इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद.. या तालुक्यात सर्वात जास्त रुग्ण

Related Posts
1 of 1,640

ज्या काही वाईट गोष्टी अवती भवती घडताना दिसतात ती क्लिप म्हणजे माझं भावनिक मानोगत होतं. त्या मनोगतात मला कोणाला ब्लेम नाही करायचं. मी त्या क्लिपमध्ये म्हणाले की, हे सगळे मनुचे अनुयायी आहेत. आपल्याला चुकीचं ठरवण्यासाठी सगळी पुरुष प्रधान व्यवस्था ही कशी एकत्र आली होती आणि एका महिलेला खच्चीकरण करण्यासाठी काय काय करत होती. नोकरी करत असताना काही उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आलेलो असतो. कारण आपण आपला स्वाभिमान कधी गहाण ठेवणार नाही असंही ज्योती देवरा म्हणाल्या.(Tehsildar Jyoti Deora said that “those” Viral clip …)

हे पण पहा – महिला तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडियो सुसाईड नोट व्हायरल-(Tehsildar Jyoti Deore)

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: