तहसील कार्यालय पटांगण मोकाट जनावराच्या घाणीचे साम्राज्य

0 114

श्रीगोंदा  ;-   श्रीगोंदा तहसीलदार( Tehsil Office)  कार्यालयाच्या समोरच्या  पटांगणात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे सौचास करत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या समोर दिवसभर शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या रात्रीच्या निवाऱ्यांचे ठिकाण बनले आहे  दिवसभर शहरात मोकाट फिरतात त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याच्या घटना त्याज्या आहेतच कार्यालय या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मोकाट जनावरांकडून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण केले जात आहे.  त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.  मात्र याकडे नगरपालिका अगदी डोळेझाक पणे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे दिवसभर लोकांचे पाय घाणीने भरत आहेत तसेच विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणाऱ्या लोकांनाही यांचा त्रास सहन करावा लागत आहे.
पोलीस स्टेशन च्या पाठीमागील तसेच तहसील कार्यालय समोरील मुतारीची अवस्था बिकट
सरकारने लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या सौचलायची व मुतारीची सोय व्हावी यासाठीच श्रीगोंदा पोलीस स्टेशन च्या पाठीमागे व तहसील कार्यालयाच्या समोर मुतारी बांधकाम करण्यात आले मात्र या मुताऱ्यांची कोणतीही देखभाल होत नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने दोन्ही ठिकाणी उग्र वास येऊन मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
Related Posts
1 of 1,603
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: