उसाचा ट्रॅक्टर व दुधाचा टँकर यांच्या, अपघातात टँकर चालक ठार

0 9

श्रीगोंदा –  उसाचा टॅक्टर ट्रेलर व दुधाचा टँकर यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टँकर चालक ठार झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नगर‌-दौड रोडवर लोणीव्यंकनाथ बसस्थानकासमोर घडला.

धक्कादायक! सिमेंटच्या वाहनात धान्याची वाहतूक , प्रशासनाचे दुर्लक्ष 

बाळासाहेब बबनराव यादव (वय ६०, रा.तांदुळवाडी, ता.बारामती) असे अपघातात ठार झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे. दुधाचा टँकर बारामतीवरून नाशीकला दूध भरण्यासाठी जात होता. यावेळी नागवडे साखर कारखान्याकडे जाणा-या उसाच्या टेलरची व टँकरची समोरासमोर धडक झाली.

जातेगाव येथे अफूची शेती ,५६ किलो अफूचे झाडे पोलीसांनी केले जप्त

यात टँकर चालक बाळासाहेब यादव हे गंभीर जखमी झाले. त्यांना लोणीव्यंकनाथ युवकांनी तातडीने दवाखान्यात पाठविले. परंतु ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

येत्या दोन दिवसांत संजय राठोड देणार आपल्या पदाचा राजीनामा ?

Related Posts
1 of 1,292
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: