टँकर आणि बसचा भीषण अपघात.., १२ जणांचा जागीच मुत्यू

0 312

बाडमेर – जोधपूर –बाडमेर हायवेवर टँकर (Tanker) आणि बसचा (Bus) भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १२ जणांचा जागीच मुत्यू झाला आहे.  भरधाव टँकर बसला समोरून धडकल्याने बसला आग लागली आणि या आगीमध्ये १२ जणांचा जाळून मुत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले.(Tanker and bus crash kills 12 on the spot)

 

Related Posts
1 of 1,463

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  बसमध्ये 25 लोक होते. राँग साईडने येत असलेले भरधाव टॅंकर बसला समोरून धडकले. या अपघातानंतर बसला आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यास अडचणी येत होत्या. यातील 13 प्रवाशांना वाचवण्यात यश आले तर 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी वर्तवली आहे.  (Tanker and bus crash kills 12 on the spot)

प्राध्यापकांच्या भरतीचा मार्ग मोकळा , पहिल्या टप्यात निघणार इतके जागा

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: