मढेवडगावला तालुकास्तरीय आर आर पाटील सुंदर ग्राम पुरस्कार : पालकमंत्र्यांच्या हस्ते नगरला वितरित

0 15
श्रीगोंदा –  सन २०१८ ते २१ या कालावधीत जिल्हास्तरीय ग्रामपंचायत आर आर (आबा) पाटील ग्राम पुरस्कार निवड प्रक्रिया पूर्ण होऊन श्रीगोंदा तालुक्यातील सर्व गावांना मागे टाकत विकासकामांबाबत अग्रेसर राहत मढेवडगाव ता. श्रीगोंदा या गावाने तालुक्यात अव्वल स्थान राखत या पंचवार्षिक योजनेचा तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार पटकावला आहे. आदर्श गाव योजनेचे पुरस्कर्ते स्व.आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त पुरस्कारांचे वितरण नगर येथील माऊली सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
  जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की चौदाव्या वीत्त आयोगात आम्ही राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना आतापर्यंत १४०० कोटी निधी दिला आहे. आणि एकूण २९ हजार कोटी रुपये निधी देणार आहोत. सर्व ग्रामपंचायतीनी या निधीचा उपयोग करून आपापल्या गावांना सुंदर बनवावे. व स्वर्गीय आर आर(आबा) यांचे ग्रामविकासाचे स्वप्न साकार करावे. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त  ग्रामपंचायतीना शुभेच्छा दिल्या. यावेळी जि. प. उपाध्यक्ष प्रताप शेळके, काशिनाथ दाते, उमेश परहर, सुनिल गडाख, मीरा शेटे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल उपस्थित होते. पुरस्काररुपी मानपत्र व मढेवडगावला २० लाख रुपयांचा विशेष विकासनिधी मिळणार आहे.

Related Posts
1 of 1,291

आमदार निलेश लंके यांच्या साधेपणाचे पुन्हा दर्शन

पुरस्कार स्वीकारण्यासाठी गावाच्या वतीने आदर्श गाव प्रणेते प्रा. फुलसिंग मांडे ,मढेवडगावच्या लोकनियुक्त सरपंच महानंदा मांडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, उपसरपंच जयश्री धावडे, सदस्य गणेश मांडे, कल्याणी गाढवे, दीपक गाडे, सरिता मांडे, अश्विनी शिंदे, पूजा साळवे, राणी मांडे, प्रतीक्षा मांडे, काळूराम ससाणे, बापू बर्डे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, वसंतराव उंडे,अंबादास मांडे, राजाराम उंडे, जयसिंग मांडे,अमोल गाढवे, प्रमोद शिंदे,संतोष मांडे, गेना मांडे, विठ्ठल वाबळे, दत्तात्रय गोरे, प्रदीप झुंजरूक, प्रफुल्ल वाबळे, शारदा झिटे, प्रतिभा उंडे, गुणाबाई वाबळे, सुनीता उंडे, बेबी मांडे, बचत गटांच्या महिला, ग्रामसचिव भाऊसाहेब माने, गोरक्षनाथ गायकवाड, तलाठी अर्चना जगताप आदर्श गाव चळवळीतील तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.
 सत्ता आल्यानंतर तीनच वर्षात आदर्श गाव प्रणेते प्रा. फुलसिंग मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुण व ग्रामस्थांच्या सहभागातून लोकनियुक्त सरपंच महानंदा मांडे यांनी गावाचा कायापालट करून विकासाच्या वाटेवर गावाची वाटचाल सुरू होऊन अल्पावधीतच गावाचा चेहरा मोहरा बदलला. काँक्रीट रस्ते, वीज, स्वच्छ पाणी, नाविन्यपूर्ण स्मशानभूमी, वृक्षारोपण, कार्यालयीन कामकाज व विविध विकासकामांमूळे सुंदर ग्राम निवड समितीचे लक्ष वेधले. संपूर्ण तालुक्यातून विविध विकासकामांबाबत आघाडीवर राहिल्याने मढेवडगावला पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे गावकऱ्यांनी जल्लोष केला व जिल्हा पातळीवरील पुरस्कार मिळवण्यासाठी आणखीन विकासात भर घालण्याचा निश्चय केला.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: