तालिबानने निवडला आपला पंतप्रधान , 24 तासांमध्ये सरकारची घोषणा?

0 269

 काबुल –   अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये तालिबान (Taliban ) ने आपला वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता तालिबान लवकरच आपली सत्ता स्थापन करणार आहे.यासाठी त्यांनी आपला सर्वोच्च नेत्याचं नाव जवळपास निश्चित केल्याची माहिती समोर आली आहे.  मुल्ला मोहम्मद हसन अखुंड (Mohammad Hassan Akhund)  यांना अफगाणिस्तानच्या पंतप्रधान (Prime Minister) पदी बसवलं जाणार आहे.याचबरोबर दोन उपपंतप्रधान (Deputy Prime Minister) ही नियुक्त करण्यात येणार असून मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दुल सलाम यांची या पदांवर वर्णी लागणार आहे.

सिराज जुद्दीन हक्कानीकडे अफगाणिस्तानच्या गृहमंत्रीपदाची जबाबादारी देण्यात येणार आहे. हक्कानीच सर्व राज्यपालांची नावं निश्चित करणार आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना असणाऱ्या आयएसआयचे प्रमुख हामिद फैज यांनी केलेल्या काबूल दौऱ्यामध्येच सरकारच्या बांधणीसंदर्भात सुरुवातीचं काम झाल्याचं सांगण्यात येतं आहे. हक्कानीला सरकारची मोट बांधण्यासाठी फैज यांनी मदत केल्याचं सांगण्यात येते. तालिबान आणि अफगाणिस्तान लष्करामधील संघर्षामध्ये लष्कराचं फार नुकसान झालं. आयएसआयने हक्कानी नेटवर्कला सुरक्षा पुरवल्याचं सांगितलं जातं. हक्कानी हा अलकायदाशी संबंध असणारा गट आहे. संयुक्त राष्ट्रांबरोबरच अमेरिकेनेही हक्कानी गटाला दहशतवादी गट म्हणून जाहीर केलं आहे.

हे पण पहा – भरपावसात निलेश लंके यांची तुफान फटकेबाजी

Related Posts
1 of 1,518

मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रलायाचं नेतृत्व मुल्ला अमीर खान मुत्ताकींकडे सोपवण्यात येणार आहे. हे सरकार सध्या कार्यवाहक पद्धतीचं सरकार असणार आहे. तालिबानच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये सरकारची घोषणा केली जाईल. पंजशीरवरही तालिबानने ताबा मिळवल्याचा दावा केला जात आहे. तालिबानविरोधी दलांचे नेतृत्व अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि तालिबान विरोधक अहमद शहा मसूद यांचे पुत्र अहमद मसूद करीत होते. या दोघांनाही तझाकिस्तानमध्ये पळ काढल्याचं सांगण्यात येतं. एनआरएफच्या नेता असणाऱ्या मसूदने पंजशीरमध्ये अजूनही युद्ध सुरु असल्याचा दावा केलाय.

आपल्या डॉक्टर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तलाठी पतीकडून खून

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: