
श्रीगोंदा :- मी मोदींना शिव्या देऊ शकतो. मारु शकतो, असे आक्षेपार्ह वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (ता. १७ जानेवारी) भंडारा येथे केले होते. त्याचे तीव्र पडसाद लगेचच श्रीगोंद्यामध्ये बुधवारी (ता. १९ जानेवारी) उमटले. भाजपा व आमदार पाचपुते यांच्या सौभाग्यवती डॉ.सौ. प्रतिभाताई पाचपुते यांनी पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध आणि संताप व्यक्त केला. या वेळी पटोलेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराच्या नागरिकांनी या जोडे मारो आंदोलनात आपला सहभाग नोंदविला.
Related Posts
भंडारा येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान पटोले यांनी मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. ‘‘आपण मोदीला मारुही शकतो व शिव्याही देवू शकतो…’’ असे वादग्रस्त विधान केल्यामुळे पटोले यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात भाजपकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आपण मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत असे वक्तव्य केल्याचा ‘यू टर्न’ पटोलेंनी वाद निर्माण होताच घेतला आहे. श्रीगोंदा भाजप कडून तहसिल कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात लोकभावना विचारात घेऊन आपण त्वरित नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, भाजपा श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, बापुतात्या गोरे, दत्ताभाऊ हिरणावळे, अशोक खेंडके, काका कदम, दिपक शिंदे, भगवान वाळके, दिलीप रासकर, राजेंद्र उकांडे, नितीन नलगे, सौ.सुहासिनी गांधी, शहाजी खेतमाळीस, सुनील वाळके, संग्राम घोडके, अंबादास औटी, संतोष क्षिरसागर, सुधीर खेडकर, महावीर पटवा, रमेश लाढाणे, संजय खेतमाळीस, महेश क्षीरसागर, सौ.संध्या रसाळ, उमेश बोरुडे, भुजंगराव काकडे, आदेश शेंडगे, ऋषिकेश गोरे, विशाल कवडे, आदित्य अनवणे आदींनी भाग घेतला. मुर्दाबाद…मुर्दाबाद.. नाना पटोले मुर्दाबाद…, नाना पटोलेचे करायचं काय, खाली डोकं, वर पाय अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या.