भाजीविक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कारवाई करा

0 230
अहमदनगर – 10 जानेवारी 2020 रोजी पहाटे जुन्या कोर्टाच्या समोर प्रतिष्ठित भाजीविक्रेते (vegetable seller) बाळासाहेब उर्फ सतीश नारायण तरोटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला त्यात त्यांना गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले असून गळ्यात असलेली दहा तोळ्याची सोन्याची चैन सुद्धा पळवली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून या घटनेमुळे पहाटे उठून मार्केटमधून भाजी आणण्यासाठी जाणार्‍या शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Take action under Mocca against the criminal who carried out the deadly attack on the vegetable seller)
 सदर गुन्ह्यातील गणेश उर्फ टिंग्या वसुदेव पोटे यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जिवंत मारणे,हत्या करणे ,जिवंत मारण्याचा उद्देशाने हल्ला करणे, दहशत करणे ,हप्ते मागणे, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा, लूटमार करून दहशत निर्माण करणे अशा अनेक प्रकारे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.  त्यामुळे टिंग्या उर्फ गणेश वासुदेव पोटे, ऋषिकेश प्रदीप लदे, अक्षय उमाकांत थोरवे, यश किरण पवार यांच्याविरुद्ध मोक्का (Mocca) कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी अहमदनगर हॉकर्स युनियन च्या वतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
Related Posts
1 of 2,047
 यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे, ऋषिकेश सतिश तरोटे, रामेश्वर अविनाश ढाणके, सुनिता अविनाश ढाणके, प्रणिता राजेंद्र तरोटे, अमित दत्तात्रय भंडारे आदी उपस्थित होते. वरील इसमाच्या विरुद्ध तातडीने मोक्का कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यापासून माझ्या कुटुंबियांस जीवितास धोका असून संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.(Take action under Mocca against the criminal who carried out the deadly attack on the vegetable seller)
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: