पाणी विकणाऱ्या त्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा….

0 13

श्रीगोंदा  :-  कुकडीचे आवर्तन सुरू आहे मात्र जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मच्याऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे हे तर शेतकऱ्यांना भेटायला तयार नाहीतना साधा कुणाचा फोन उचलण्याची ते तसदी घेतात असे आरोप शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी केला आहे

त्यातच तालुक्यातील पुढारी आपल्या राजकीय फायद्यासाठी सध्या झगडताना दिसत आहेत आपल्याला राजकीय पद कस मिळेल यात तालुक्यातील नेते मंडळी व्यस्त आहेत त्यामुळे अधिकारी भेटत नाहीत नेते काही दखल घेत नाहीत अश्या अवस्थेत श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र कुणीच वाली राहिला नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

२०१४ नंतर भारतामधील स्वातंत्र्य कमी झाले- ग्लोबल फ्रीडमचा अहवाल

शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी आज फेसबुक लाईव्ह करत जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी संगनमताने शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी विकत असल्याचा गंभीर आरोप केला आहे तसेच १३२चारीवर जेसीबीच्या साहायाने चारीला भगदाड पाडून ते पाणी ओढ्याला सोडल्याचे दाखवत जलसंपदा विभाग पैसे घेऊन हे पाणी विकत असल्याची टीका त्यांनी केली आहे

तसेच कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे हे कुठेही ओढ्याला पाणी सुरू नसल्याचे सांगतात परंतु चारीला भगदाड पाडत ओढ्याला सुरू असलेल्या पाण्याबाबत विचारणा करण्यासाठी फोन केल्यावर मात्र ते फोन उचलत नाहीत कार्यालयात गेल्यावर शेतकऱ्यांना भेटत नाहीत असा आरोप केला आहे तसेच सदर चारी फोडून पाणी विकणाऱ्या अधिकारी कर्मच्याऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील काकडे यांनी केली आहे

आरोप चुकीचे,एकाही शेतकऱ्याचे भरणे राहणार नाही,चारी फोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू -कार्यकारी अभियंता,स्वप्नील काळे

Related Posts
1 of 1,301

१३२चारी ही लिंपणगाव परिसरातील काही पाणीवापर संस्थेच्या लोकांनी फोडली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून,वाया गेलेल्या पाण्याची दंड आकारणी करणार आहोत पाणी विकल्याचा आरोप पूर्णतः चुकीचा आहे असा कुठलाही प्रकार नाही तसेच या आरोपांमध्ये तथ्य नाही आपण अनोळखी नंबर असला तरी फोन उचलतो तसेच श्रीगोंदा कार्यालयात कायम शेतकऱ्यांना भेटतो फोन न उचलणे किंवा लोकांना न भेटणे हा आरोप खोटा आहे तसेच पंधरकर नावाचा कर्मचारी हा एकटाच असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा लोड आहे आपण स्वतः सर्व चार्यांवर फिरून शेतकऱ्यांना पाणी मिळेल याचे नियोजन करत आहोत अद्याप कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार नाही तसेच तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचे भरणे राहणार नाही यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे पण नियमाने काम करत असताना त्रास होतो अशी प्रतिक्रिया कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी दिली.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या, काँग्रेस नेत्यांची  मागणी  

पंधरकर नावाच्या कर्मच्याऱ्यावर नाराजी
जलसंपदा विभागातील पंधरकर नावाच्या एका कर्मच्याऱ्यावर शेतकरी तीव्र नाराज आहेत सदर कर्मचारी शेतकऱ्यांशी नीट बोलत नाही कुणाचेही फोन उचलत नाहीत अश्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या या कर्मच्यार्याबद्दल आहेत तसेच पाणी वाटपात देखील हा कर्मचारी मोठा अन्याय करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत या कर्मच्याऱ्याविरोधात काही दिवसांपूर्वीच स्टेशन परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रार केली होती परंतु वरिष्ठांकडून त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही.

मुंबईत माझ्या जीवाला शिवसेनेकडून धोका आहे – कंगना रानौत

आता तरी तालुक्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा
राजकीय स्वार्थासाठी विरोध विसरून एकत्र येणाऱ्या तालुक्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा जलसंपदा विभागाच्या या कार्यकारी अभियंता व बेजबाबदार कर्मच्याऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी नेते राजेंद्र काकडे यांनी केली आहे

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: