पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्या त्या हल्लेखोरांवर कारवाई करा

0 109

 श्रीगोंदा  – बीड (Beed) जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मौजे पारनेर येतील आदिवासी पारधी समाजातील खोट्या चोरीच्या संशयातून खुनी हल्ला करणान्या हल्लेखोरांवर मोक्का अंतर्गत कारवाई करून पिडीत पारधी कुटुंबाचे पुनर्वसन करावे तसेच त्यांना गावगुंडांपासून धोका असल्यामुळे पोलीस संरक्षण देवून न्याय द्यावा अशी मागणी आदिवासी फासे पारधी संघटनेचे राजेंद्र काळे यांनी श्रीगोंदा तहसिलदार मिलिंद कुलथे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. यावेळी मोठ्या प्रमाणात पारधी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पारनेर गावांमध्ये दिनांक २५ सप्टेंबर रोजी पारधी वस्तीवर गावातील जमावाने केलेल्या हल्यात मानू उर्फ सिद्धांत अरुण काळे या बालकांचा जागीच मृत्यू झाला झाले. यावेळी उपचारदरम्यान अभिमान पांढऱ्या काळे या वृद्धाचा मृत्यू झाला. तर इतर लोक गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पारनेर येथे बोकड चोरीच्या संशयावरून ग्रामस्थ व पारधी वस्तीवरील लोकांमध्ये पाच दिवसापासून वाद चालू  होता यावेळी पारधी वस्तीवरील एका तरुणाचा  भगवान औटे यांच्या सोबत वाद झाल्याचा राग धरून २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जमावाने पारधी वस्तीवर हल्ला केला आहे. यात तोड़ फोड़ करून घरे पेटवून दिले व लोकांना पुरुष महिलांना मारहाण केली. यामध्ये मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवगृहात असून सर्व समाजाची मागणी सर्व आरोपींना अटक करण्यात यावी व समाजातील लोक पोलीस अधीक्षक बीड व जिल्हाधिकारी बीड यांच्या कडे मागणी करत आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 2 नोव्हेंबरला निकाल – निवडणूक आयोग

Related Posts
1 of 1,603

 यासाठी आदिवासी पारधी समाज संघटना महाराष्ट्र विविध तालुका व जिल्हा राज्यपातळी वर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पारनेर येथील जातीवादी गावगुंड व नंगड लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, पिडीत कुटुंबाचे पूनर्वसन करण्यात यावे, त्यांना आदिवासी विभागाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, पोलीस संरक्षण मिळावे, बीड जिल्हा आदिवासी अत्याचारग्रस्त जाहीर करून आदिवासी लोकांना व कुटुंबातील व्यक्तींना व मुलांना शिक्षण, संरक्षण, आरोग्य समाजातील दर्जा उंचविण्यासाठी पारधी विकास आराखडा राबविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी आदिवासी फासे पारधी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, महिला आघाडी अध्यक्ष सुनिता भोसले, जिल्हाध्यक्ष अजित भोसले, बसपाचे सुनील ओहोळ, घोटवीचे सरपंच अविनाश चव्हाण, राहुल भोसले, मिथुन चव्हाण, स्वप्नील पवार, सतीश भोसले आदि उपस्थित होते.

हे पण पहा  –औरंगाबाद : पावसाच्या पाण्यात दुकानं गेली वाहून…

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: