DNA मराठी

सहा गावठी कट्टे व बारा जिवंत काडतुस जप्त …

गावठी कट्टे व बारा जिवंत काडतुस अवैधरित्या कब्जात बाळगणारा आरोपीला अटक

0 121

Suspected Arms Supplier Arrested; 6 Pistols, 12  Cartridges Seized

नगर : सोनई  नेवासा येथे विक्री करण्याचे उद्देशाने सहा गावठी कट्टे व बारा जिवंत काडतुस अवैधरित्या कब्जात बाळगणारा आरोपीला एक लाख छप्पन हजार रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.

या आदेशान्वये पोलिस निरीक्षक अनिल कटके हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असताना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की, कुकाणा (ता. नेवासा) येथील रेकॉर्डवरील एक आरोपी हा गावठी बनावटीचे कट्टे व जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने घोडेगांव-चांदा रस्त्यावर, सोनई (ता. नेवासा) येथे येणार आहे. ही खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.

सत्तेच्या नशेत नेत्यांकडून गैर कृत्यांचे प्रकार वाढ, राजकारणात डागाळलेली नेते, तरीही मी तो नव्हेच.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/गणेश वारुळे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय हिंगडे, बापु फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व चापोहेकॉ/अर्जुन बडे अशांनी मिळून शेतकरी, शेतमजुर असे वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने घोडेगांव- चांदा रोड येथे जावून सापळा लावून थांबलेले असताना गळ्यात एक सॅक असलेला बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम दिसला पथकाची खात्री होताच पथक संशयीतास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना तो पळून जावू लागला. लागलीच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस पथकाची ओळख सांगून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख (वय 34, रा. कुकाणा, ता. नेवासा) असे असल्याचे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता अंगझडतीत एका राखाडी रंगाचे सॅकमध्ये सहा गावठी बनावटीचे कट्टे व दहा जिवंत काडतूस मिळून आल्याने जप्त करण्यात आला आहे.

Related Posts
1 of 22

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही…Eknath Shinde

ताब्यातील इसमाकडे गावठीकट्टे व काडतुसाबाबत विचारपूस करता सुरुवातीस तो समाधानकारक उत्तरे न देता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास अधिक विश्वासात घेऊन सखोल व बारकाईन चौकशी करता त्याने सदर गावठीकट्टे व जिवंत काडतूस विक्री करण्याचे उद्देशाने आणले असल्याचे सांगितले.
ताब्यातील आरोपीकडे सहा गावठी कट्टे, दहा जिवंत काडतूस व एक राखाडी रंगाची सॅक असा एकुण एक लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर बाबत पोहेकॉ संदीप कचरु पवार यांनी सोनई पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. 143/2023 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.

आरोपी नामे कयामुद्दीन ऊर्फ भैय्या कुतुबूद्दीन शेख हा सराईत गुन्हेगार आहे. त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात अग्नीशस्त्रासह खुनाचा प्रयत्न व आर्म ऍ़क्ट असे गंभीर स्वरुपाचे एकूण दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक, स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, अतिरिक्त प्रभार शेवगांव विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: