नवनीत राणा यांच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंनी लावला टोला, म्हणाले, तुम्हाला खरं सांगू का? ..

0 230
Supriya Sule lashed out at Navneet Rana's role and said, "Shall I tell you the truth?" ..
 मुंबई –   राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या निवासस्थानी मातोश्री(Matoshri)बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिल्याने ते सध्या चर्चेचा विषय बनले आहे. आज सकाळपासूनच महाविकास आघाडीचे नेते (MVA) त्यांच्यावर टीका करत आहे. मात्र मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यावर ते ठाम असल्याने राजकीय वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी खोचक शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
माध्यमांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठणाबाबत घेतलेल्या भूमिकेवर विचारणा केली असता त्यावर सुप्रिया सुळेंनी “माझी सगळ्या गोष्टींवर श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही”, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, यावर बोलताना इतर खासदारांच्या कामाचा फारसा अभ्यास नसल्याचं सुप्रिय सुळे म्हणाल्या. “तुम्हाला खरं सांगू? माझ्या मतदारसंघात मला इतकी कामं असतात, की मला बाकीचे खासदार काय करतात याचा फारसा अभ्यास नसतो. लोकसभा मतदारसंघ, त्याचा व्याप फार मोठा असतो”, असं त्या म्हणाल्या. दिल्लीतील नवनीत राणांच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “नवनीत राणा दिल्लीत खूप अॅक्टिव्ह आहेत. खूप वेळा भाषण करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत”.
Related Posts
1 of 2,452

आज मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा राणा दांपत्याने केली होती. या घोषणेपासूनच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे साकाळीच राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. तसेच, तिथले बॅरिकेड्स तोडून शिवसेना कार्यकर्ते इमारतीमध्ये घुसल्याचं देखील समोर आलं होतं.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: