सुप्रिया सुळे यांची दिल्लीच्या सीमेवर हजेरी ,आंदोलक शेतकऱ्यांची घेतली भेट

0 9
नवी दिल्ली –  देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागच्या दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून केंद्रसरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. आपल्या पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आता पर्यंत दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी आंदोलनात सहभाग केलाय.
 
मागच्या दोन दिवसापूर्वीच शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी सुद्धा दिल्लीच्या सीमेवर जाऊन आंदोलन करणारे शेतकरी संघटनांशी चर्चा करून केंद्र सरकारवर टीका केली होती.  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात विनायक राऊत,अनिल देसाई, अरविंद सावंत,राजन विचारे, प्रताप जाधव, कृपाल तुमाने आदींचा समावेश होता. त्यानंतर आता विरोधी पक्षांच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर इथं पोहोचले आहे.

१६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची आणि तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांची हत्या

यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला आणि आपल्या पक्षाचा पाठिंबा दर्शवण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकरी संघटनेची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे यांच्याबरोबर अकाली दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर तसेच डीएमके पक्षाचे कनिमोझी , तृणमूल काँग्रेसच्या पक्षाचे सौगत रॉय आदी नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेस शिवाय जवळपास १० विरोधी पक्षाचे १५ पेक्षा जास्त नेते पोहचले आहे.
Related Posts
1 of 1,292

 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: